भूगोल विषयातील नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यातील आपले जीवन यशस्वी करा – प्राचार्य पुरंधर नारे.*

*भूगोल विषयातील नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यातील आपले जीवन यशस्वी करा – प्राचार्य पुरंधर नारे.*

 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील भूगोल विभागाच्या वतीने आज फॅकल्टी एक्स्चेंज कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी कणकवली महाविद्यालयाचे, प्रा. डॉ. तेजस जयकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बीए भाग तीनच्या वर्गातील विद्यार्थ्यांना भूगोल विषयांमधील तज्ञ अशा व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्यक असते.

यावेळी डॉ.तेजस जयकर म्हणाले, जीआयएस हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करते. या कौशल्याचा वापर करून विद्यार्थी सर्वेक्षण विभाग, नगर नियोजन, हवामान खाते, मृदा संधारण, पर्यटन, इको टुरिझम, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी काम करू शकतो अशा सरकारी व निमसरकारी क्षेत्रामध्ये भूगोल विषयांमध्ये अध्ययन केल्यानंतर, पदवी, घेतल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक छोटे छोटे व्यावसायिक कोर्स करावेत.

 

 

 

अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य पुरंदर नारे म्हणाले आज संगणक युगामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे आपल्याला ते शिकणे गरजेचे आहे. पृथ्वीच्या नैसर्गिक घटकापासून ते मानवी समाजाच्या विकासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास, भूगोल या विषयांमध्ये केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या समाजासाठी तसेच प्रादेशिक विकासासाठी, अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास, तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास स्वतःला रोजगार मिळू शकतो. म्हणून भूगोलासारख्या विषयांमध्ये व्यवसाय निर्मिती सारखा अभ्यास असल्याने विद्यार्थ्याने त्याचा सखोल अभ्यास करून, आपल्या भावी जीवनासाठी उपयोग करावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. राजाराम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संजय पाटील यांनी मांडले.