मालवण शहरातील तीन नवे विद्युत ट्रान्सफार्मर गणेश चतुर्थी पूर्वी कार्यान्वित होणार

कमी दाबाची वीज समस्या मार्गी लागणार ; आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुरत्न योजने अंतर्गत मंजुरी : शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील कमी दाबाची वीज समस्या मार्गी लागावी यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुरत्न योजने अंतर्गत मालवण शहरात मंजूर झालेले तीन विद्युत ट्रान्सफार्मर गणेश चतुर्थी पूर्वी कार्यान्वित होणार आहेत. अशी माहिती शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी दिली आहे.

 

नागरिकांना अधिकाधिक सेवा सुविधा मिळण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील असतात. त्याच सेवेचा एक भाग म्हणून शहरातील फोवकांडा पिपळ सोमवार पेठ मालवण, महाराजा हॉटेल नजीक एलआयसी ऑफीस जवळ, बोर्डीग ग्राऊड टोपीवाला हायस्कुल मागे याठिकाणी हे तीन विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर झाले असुन कार्यान्वित होणार आहेत. याबाबत दिपक पाटकर यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांसोबत सिंधुरत्न योजना अध्यक्ष आमदार दिपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत.