” संताची पायी हा माझा विश्वास | सर्वभावे दास झालो त्यांचा || “

फोंडाघाट ते आदमापूर श्री संत बाळूमामा पायी वारीचे प्रस्थान !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — गेली वीस वर्षे ह. भ. प. गुरुवर्य विनोद महाराज (मुंबई) व ह. भ. प. गायकवाड महाराज फोंडाघाट यांचे मार्गदर्शनाखाली, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी, श्री संत सद्गुरु बाळूमामा महाराज – आदमापुर पर्यंत, पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान श्री साई मंदिर हवेलीनगर येथून भजन- कीर्तन- नामस्मरणाच्या घोषात करण्यात आली. या दिंडीमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे महिला पुरुष सहभागी झाले होते.वाटेत राधाकृष्ण मंदिर येथे दिंडीला, बालगोपाळ मंडळ,फोंडाघाट कडून शुभेच्छा व चहापान देण्यात आले.यामध्ये युवाई चा लक्षणीय सहभाग, अध्यात्माचा पुढील पिढीकडे वारसा, आशादायी होता. त्यामुळे हवेली नगर- बाजारपेठ – मारुती वाडी रस्ता चैतन्यांने भारला होता…