मंडणगड | प्रतिनिधी : आर.के. फाऊंडेशन संचालित कृषी ज्ञान प्रोबोधिनी आणि आनंद विहार योगाश्रम तळघेर यांच्या संयुक्त विद्यमाने दहागाव निमदेवाडी येथे नुकतेच निसर्गवासी रामचंद्र धोंडू खाडे स्मृति बालयोग संस्कार केंद्राचा शुभारंभ निवृत्त पोलीस उपनरिक्षीक सहदेव म्हसकर यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आनंद विहार योगाश्रमाचे संचालक दिनेश पेडणेकर, सचिन थोरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राकाश गांधी यांनी भुषविले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक केंद्रांचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी केले. दिनेश पेडणेकर यांनी बालयोग सेवाश्रम म्हणजे काय हे विस्तृतपणे नमुद केले. व ग्रामिण भागातील मुले व महिला व जेष्ठांकरिता किती महत्वाचे आहे याचे महत्व विषद केले. उद्घाटक सहदेव म्हसकर यांनी संस्कार केंद्राची गरज नमुद करताना प्रत्येक गावात असे केंद्र सुरु करुन त्यातून चांगला माणुस घडण्याची प्रक्रीया सुरु व्हावी असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एकनाथ चांदे यांनी केले तर आभार रविंद्र मंद्रे यांनी मानले. कार्यक्रमास प्रकाश भडवणकर, भिकाजी खाडे, रेश्मा जगताप, ग्रंथपाल पुजा दळवी, उपसरपंच रुपाली मोरे, समीर गांधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर गांधी, प्रशांत तोडकर, स्वाती खाडे, दगडू चव्हाण, सुहास रहाटे, सुरेश देवरुखकर, शंकर रहाटे, नितीन रहाटे, रुपाली, खाडे, मंदा रेवाळे, सुवर्णा रेवाळे, अनिल जगताप, सचिन निमदे, सुशिल खाडे, दीपा खाडे यांनी सहकार्य केले.
फोटो ओळी- संस्कार केंद्राचे उद्घाटन समारंभात बोलताना दिनेश पेडणेकर व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.












