टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत गावपातळीवर तपासणी व जनजागृती उपक्रम

प्राआकेंद्र फूपेरे कार्यक्षेत्र – आयुष्यमान आरोग्य मंदिर गोठणे दोनिवडे येथे एक्स-रे व टीबी तपासणी शिबिर यशस्वी

रत्नागिरी :
टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत टिबी मुक्त ग्रामपंचायत या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात एक्स-रे तपासणी क्षयरोग तपासणी मोहीम राबविली जात आहे.

दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी राजापूर तालुक्यातील प्राआकेंद्र फूपेरे कार्यक्षेत्र – आयुष्यमान आरोग्य मंदिर गोठणे दोनिवडे कार्यक्षेत्रात टीबी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. गोठणे दोनिवडे येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात सकाळी 9:00 पासून संध्याकाळी 5:00 पर्यंतवाजेपर्यंत एकूण 139 छातीचे एक्स-रे तसेच टीबी चाचण्या पार पडल्या.

उंच डोंगरावर अतिदुर्गम भागामध्ये घेण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेसाठी गोठणे दोनिवडे,शिळं, आंगले, दोनिवडे, फूपेरे या गावांमधून ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामस्थाना येण्यासाठी व परत घरी सोडणे साठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून व गाव पातळी वरून वाहनाचे नियोजन करण्यात आले होते . या उपक्रमात जिल्हास्तरावरून आरोग्य पर्यवेक्षक मंगेश पाटील,एक्स-रे टेक्निशियन श्री हंगे,तसेच वैद्यकीय अधिकारी फूपेरे श्रीमती डॉ कांबळे ,आरोग्य सहाय्यक कळसकर,समुदाय आरोग्य अधिकारी देवकाते, एस.टी.एस. राहुल कोकणे तसेच प्राथमिक केंद्रातील सर्व आरोग्य सेवक, सेविका, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांचा सक्रिय सहभाग लाभला.

अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे टीबी मुक्त भारत अभियानाला गावपातळीवर बळकटी मिळत असून, लवकर निदान–लवकर उपचार या धोरणालाही गती मिळत आहे. टीबीची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी,असे आवाहन डॉ महेंद्र गावडे यांनी केले आहे.
टीबीसाठी आवश्यक सर्व तपासण्या ग्रामिण रूग्णालय राजापूर व रायपाटण येथे मोफत केल्या जातात, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक राजापूर व रायपाटण डॉ राम मिस्त्री,तालुका आरोग्य अधिकारी राजापूर डॉ बालाजी लोकरे यांच्यावतीने सांगण्यात आले.