न्हावेली येथील श्री देव रवळनाथ माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 30 नोव्हेंबर रोजी  

न्हावेली – श्रेयस गावडे

न्हावेली येथील श्री देव रवळनाथ माऊली चा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी पूजा झाल्यानंतर ओठी भरण्याचा कार्यक्रमाला सुरवात होणारा आहे

रात्री देव तरंगची मंदिर प्रदक्षिणा होणार असून मध्यरात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.

भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.