हडी, आमडोस यासह अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्याला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले आहे.
हडी येथील गणपत नारायण चव्हाण यांच्या घरावर मंगळवारी झाड कोसळले. यात छप्पराचे नुकसान झाले आहे. तर आंबडोस येथे जिप शाळा व्हाळवाडी येथे संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मालवण तहसील कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.












