सुजाता संदिप गवस यांची सामाजिक बांधिलकी.

ओटवणे (प्रतिनिधी) शिक्षक हा जरी शिक्षकी पेशातूनसेवा निवृत्त झाला तरी तो सेवेतून कधीच निवृत्त होत नाही त्याची देण्याची वृत्ती कधीच संपत नसते. ज्ञानरुपी अमृत आपल्या विध्यार्थ्यांना देता देता सेवा निवृत्त होतो पण देण्याची वृत्ती कधीच सोडत नाही याचीच प्रचिती म्हणजे नुकत्याच पडवे माजगाव शाळेतून निवृत्त झालेल्या पदवीधर शिक्षिका सौ सुजाता संदीप गवस यांनी आपल्या निवृत्तीदिनी पणदूर येथील संविता आश्रमाला केलेलं अन्नदान व वश्रदान. सेवा भावी वृत्तीने आयुष्य जगणाऱ्या गवस मॅडम यांनी निवृतीचा क्षण संविता श्रमातील निराधारा समवेत घालवीत एक आदर्श घालून दिला. पडवे माजगाव शाळेतून निवृत्त होणाऱ्या सुजाता गवस यांनी अनेक शाळावर केवळ नोकरी म्हणून नाही तर सेवा म्हणूनच काम केले. असंख्य गुणवंत विधार्थी घडविले. त्यांचे अनेक विधार्थी त्यांनी केलेल्या संस्कारामुळे आज उच्च पदावर,समाजात प्रतिष्टेचे जीवन जगतात गवस मॅडम यांनी आतापर्यंत जो ज्ञान रुपी वसा दिला तो त्यांचे विधार्थी पुढे चालवीतात पण निवृत्ती नंतर त्यांनी केलेल्या सत्कार्यामुळे त्यांचे विधार्थी वर्गाच्या मनातील स्थान अजून भक्कम झाले आहे.त्यांनी निवृत्ती दिनी एक आदर्श घालून दिला.

त्यांच्या आश्रमातील या सेवाभावाने सर्व निराधार भारावून गेले. सविता आश्रम मध्ये त्यांनी केलेल्या सेवेबद्दल सविता आश्रमचे संदीप परब यांनी सौ सुजाता संदीप गवस यांचे आभार मानले.व त्यांना शुभेच्छा ही दिल्या.