जलस्त्रोत बळकटीकरणासाठी लब्देवाडी ग्रामस्थ सरसावले

लब्देवाडी तळ येथे गोडे पाणी अडविण्यासाठी बांधला बंधारा

आचरा-अर्जुन बापर्डेकर
चिंदर लब्देवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत लब्देवाडी तळ येथे गोडे पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारा बांधत दुष्काळ परीस्थितीवर मात करण्यासाठी एक आदर्श निर्माण केला.या बंधा-यामुळे चिंदर लब्देवाडी भागातील जलस्रोत बळकटी करण्यासाठी हातभार लागणार आहे.तसेच या भागात होणा-या उन्हाळी शेती साठी आवश्यक पाण्याच्या दृष्टीनेही याचा फायदा होवू शकतो.हा बंधारा बांधण्यासाठी चिंदर ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर,समीर लब्दे, सुधाकर लब्दे, ऊमेश लब्दे, प्रविण लाड, दर्शन लाड, गणेश लाड, यश लाड,चारुदत्त लब्दे,दिपेश लब्दे, मधुकर लब्दे, दिवाकर लाड, दाजी लब्दे, यांसह अन्य आदी लब्देवाडीतील ग्रामस्थ ऊपस्थित होते.लब्दे वाडी ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकीतून आदर्श निर्माण केला आहे.