मालवण शिवसेनेचाच ‘बालेकिल्ला’ राहील : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भगव्या लाटेत शिवसेना उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा

तुमचे एक मत मालवण शहाराचे भविष्य घडवणार

निलेश राणे मागतील तेवढा विकासनिधी मालवण नगरपरिषदेला देणार

शिवसेनेचे खणखणीत नाणे म्हणजे आमदार निलेश राणे

जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादात मालवणात शिवसेनेची जाहीर सभा

अमित खोत | मालवण : कोणी कितीही लावा शक्ती मात्र मालवण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि यापूढेही राहील. विकासाची तळमळ असणारे शिवसेनेचे खणखणीत नाणे आमदार निलेश राणे यांच्या रुपाने या मतदारसंघाला लाभले आहेत. निलेश राणे मागतील तेवढा विकासनिधी मालवण नगरपरिषदेला आणि या मतदार संघाला उपलब्ध करून देणार. होणारी निवडणूक मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. तुमचे एक मत मालवण शहाराचे भविष्य घडवणार. मालवण वासियांनी शिवसेनेची भगवी लाट आणत शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांसह शिवसेना नगरसेवक, नगरसेविका उमेदवार यांना बहुमतांनी विजयी करा. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मालवण येथे जाहीर सभेत बोलताना केले.

मालवण टोपीवाला हायस्कुल पटांगण येथे रेकॉर्ड ब्रेक गर्दीत जनतेच्या अभूतपूर्व अश्या प्रतिसादात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, बाळा चिंदरकर, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, वसंत गावकर, देवयानी शिर्सेकर, महेश सारंग, पूजा मांजरेकर, दिपक पाटकर, निना मुंबरकर, सिध्दार्थ जाधव, पूनम चव्हाण, विलास मुणगेकर, नंदीता वरवडेकर, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, नरेश हुले, मेघा गावकर, राजन परुळेकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, प्रमिला मोरजे, सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर यांसह शिवसेना पदाधिकारी महिला जिल्हा प्रमुख दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, राजन सरमळकर, विजय चव्हाण, बबन शिंदे, उमेश नेरुरकर, परशुराम पाटकर, राजा गावकर, जाॅन नरोन्हा, काका कुडाळकर, संजय पडते, आनंद शिरवलकर, विनायक बाईत, राजा गावडे, विश्वास गावकर, जॉन नरोना, विनायक राणे, मनोज राणे, शेखर गाड, प्राजक्ता शिरवलकर, दिपलक्ष्मी पडते, संग्राम साळसकर, मधुरा तुळसकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, अभय कदम, राजेश पारकर, निकीत वराडकर, जाबीर खान, निशय पायेकर, अखिलेश शिंदे, सुरज बिरमोळे यांसह मोठया संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मी मुख्यमंत्री असताना आणि आताही कार्यकर्ता म्हणून काम करतो. अनेक जन हिताचे निर्णय घेतले. मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत यासह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माझी सर्वात आवडती योजना. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. असे सांगत लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आणि तमाम जनता आपल्या पाठीशी आहेत. लाडक्या बहिणींना मला लखपती करायचे आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरातील बचत गट यांसाठी भांडवल उभारून देणार असे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले.

मालवण शहाराचा सर्वांगीण विकास हेच आपले लक्ष राहील. नगरविकास खाते आणि पर्यटन खाते या माध्यमातून मोठया निधी मालवण शहराला विकासासाठी व पर्यटन वाढीसाठी उपलब्ध करून देणार. विकासातून मालवणचा कायापालट करणार असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देताना शिवसेना सर्व नगरसेवक उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आ. निलेश राणे यांचे हात बळकट करूया : दत्ता सामंत

आमदार निलेश राणे हे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी रहा. सर्व शिवसेना उमेदवारांना विजयी करून शिवसेनेचा भगवा फडकवूया. असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले.

शिंदे साहेबांना शब्द देतो मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार : आ. निलेश राणे

आमदार निलेश राणे म्हणाले, 21 व्या शतकातील मालवण शहर हेच माझे लक्ष आहे. मालवण कुडाळ मधील मागील दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. शिंदे साहेब यांच्या नगरविकासच्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधी आणणार. शिंदे साहेबांकडे मागणी केली की विकास निधी मिळणार ही गॅरंटी आहेत. मालवण शहरासाठी आमचे व्हिजन आहे. आमचे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत. पारदर्शक कारभार ही शपथ घेणारे आमचे उमेदवार आहेत. मी शिंदे साहेबांना शब्द देतो 3 डिसेंबरला शिवसेनेचा भगवा फडकणार. साहेब तुम्हाला बघून तुमच्या कामामुळे ऊर्जा मिळते. दहा वर्षा नंतर तुम्ही संधी दिली. जे बोलतात ते करून दाखवतात हे शिंदे साहेब. त्यांना अपेक्षित काम मतदार संघात करून त्यांना गर्व वाटेल असे काम करणार. एकदा संधी द्या तुम्हाला गर्व वाटेल असे काम शिवसेना म्हणून करणार हे सांगितले आणि करण्याचा प्रयत्न करतं आहे. आहे तिथे 100 टक्के राहणार. शेवटच्या श्वासा पर्यत शिंदे साहेब यांच्या सोबत राहणार. असे सांगून आमदार निलेश राणे पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जनतेने आम्हाला भरभरून दिले. मतदार संघ राणे साहेबानी जपला यापूढे शिवसेना आणि शिंदे साहेब यांच्या ही माध्यमातून आम्ही हा मतदार संघ आम्ही जपणार. गतिमान विकासातुन हा मतदारसंघ आदर्श असा मतदारसंघ बनवणार. जनतेचीच सेवा करायची आहे. मालवण शहाराच्या विकासासाठी आमच्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक उमेदवारांना विजयी करा. भ्रष्टाचार मुक्त कारभार मालवण पालिकेत दिसेल. असे आमदार निलेश राणे म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मतदार संघ विकासात मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच संघटना वाढ मध्ये दत्ता सामंत यांचेही योगदान मोठे आहे. विजयात त्यांचेही योगदान मोठे असेल. 3 तारीख ला विरोधकांचे टांगे पलटी होतील. शिवसेनेचा विजय निश्चित आहे. असेही आमदार निलेश राणे म्हणाले.

निलेश राणे शिवसेनेचा ‘हिरा’ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निलेश राणे शिवसेनेची भगवी रेष आहेत. कोकणातील शिवसेनेचा हिरा आहेत. “इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा.” असे म्हणत त्यांनी निलेश राणे यांना शिवसेनेचे ‘खणखणीत नाणे’ आणि ‘बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमधील महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले. निलेश राणे हे पक्षासाठी व मतदारांसाठी ‘जिवाचं रान’ करणारे कार्यकर्ते आहेत, असा गौरव त्यांनी केला. निलेश राणे यांच्यासारखा आमदार मालवणकरांना मिळाला आहे, जो मतदार संघासाठी तळमळीने काम करतो. त्यांच्या मागे एकनाथ शिंदे आहेत. निलेश राणे मागतील तेवढा विकासनिधी मालवण शहाराला देणार असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.