चिपळूण :समाजातील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक व विवेकनिष्ठ विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने मानव धर्म सभागृह, सेवा सदन खेर्डी, चिपळूण येथे रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चिपळूणतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विवेकवादी मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीत सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या प्रशिक्षणात समाजजागृतीसाठी प्रभावी संवाद, प्रत्यक्ष कामाची पद्धत व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : सचिन मोहीते – 70382 21416, संदीप गोवळकर – 9653391877 या नंबर संपर्क करावा. असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,चिपळूण यांनी केले आहे.












