ना. नितेश राणे यांनी सावंतवाडीत भेट देत घेतला बुथनिहाय आढावा

भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सावंतवाडी शहरात भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन मतदानासंदर्भात बूथनिहाय आढावा घेतला. त्यावेळी कार्यकर्ते व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित असून गुलाल आम्हीच उधळणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.