राजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी सकाळी ११:३० पर्यंत ३०.२८% मतदान!

राजापूर | प्रतिनिधी
​रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपरिषद निवडणुकीत सकाळी ११:३० वाजेपर्यंत राजापूरमध्ये ३०.२८% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

​राजापूर नगरपरिषदेत एकूण ८,१४३ मतदार असून, यात पुरुष मतदार ३,९२४ आणि स्त्री मतदार ४,२१९ आहेत.

​त्यात ​सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत १४.२५% मतदान झाले.
​एकूण १,१६० मतदारांनी मतदान केले.
​पुरुष मतदार: ७१३
​स्त्री मतदार: ४४७

तर ​सकाळी ७:३० ते ११:३० या ४ तासांत ३०.२८% मतदान झाले.
​एकूण २,४६६ मतदारांनी मतदान केले.
​पुरुष मतदार: १,३५१
​स्त्री मतदार: १,११५

​काही वॉर्डांमध्ये मतदानाचा उत्साह विशेष दिसून आला:
​वॉर्ड क्र. ३: येथे सकाळी ११:३० पर्यंत सर्वाधिक ४१.६१% मतदान झाले.
​वॉर्ड क्र. ८: येथे ३८.३६% मतदारांनी आपला हक्क बजावला.
​वॉर्ड क्र. ४: या वॉर्डात ३८.८९% मतदान झाले.
​सर्वात कमी मतदान वॉर्ड क्र. ६ मध्ये दिसून आले, जेथे १४.२५% मतदारांनी मतदान केले.