गुहागर :
गुहागर नगरपंचायत निवडणूकिसाठी आज मंगळवारी सकाळी 7.30 साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आतापर्यंत येथील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे सकाळी 11.30 वाजेपर्यंत या ठिकाणी एकूण 46. 47% इतके मतदान झाल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.
सकाळी 11.30 वाजेपर्यंत 2770 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये 1452 पुरुष मतदारांनी तर 1318 स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.











