खेड नगरपरिषद निवडणुकीत ११.३० वाजेपर्यंत २८.१% मतदान; ३२३६ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

खेड :
खेड नगरपरिषद, जिल्हा रत्नागिरी येथील सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज मतदान सुरळीतपणे सुरू झाले असून सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत २८.१ टक्के मतदान नोंदले गेले आहे. एकूण १३,३९५ मतदारांपैकी सकाळपर्यंत ३२३६ मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावला आहे. यामध्ये १२७९ पुरुष आणि १९५७ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून पुढील तासांमध्ये मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.