मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील वायंगवडे गावाच्या श्री देवी पावणाई रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव 4 डिसेंबर रोजी होणार आहे. विधिवत पूजा व धार्मिक विधी कार्यक्रम, ओट्या भरणे व पालखी नंतर रात्री बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. 6 डिसेंबर रोजी हरिनाम सप्ताह होणार आहे. व सांगता 7 डिसेंबर रोजी होणार आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.











