कुवळे–आगरवाडी रस्त्याचे खडीकरण–डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर

शिरगांव (प्रतिनिधी)देवगड तालुक्यातील कुवळे–आगरवाडी ते भावई देवी मंदिर या मार्गाच्या खडीकरण–डांबरीकरणाचे कामाचे भूमिपूजन मंगळवार, कुवळे–रेंबवलीचे सरपंच श्री. सुभाष कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

 

सदर काम जनसुविधा योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले असून, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून या कामाला गती मिळाली आहे. सुमारे २२५ मीटर लांबीच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असून, या कामासाठी अंदाजे १० लाखांचा निधी मंजूर आहे.

 

या प्रसंगी सरपंच सुभाष कदम, उपसरपंच सुहास राणे, बूथ प्रमुख अजित घाडी, माजी उपसरपंच प्रदोष प्रभुदेसाई, ग्रामपंचायत सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर तसेच गणपत लाड, सूर्यकांत लाड, प्रकाश लाड, गजानन लाड, दत्तात्रय कुवळेकर, रामचंद्र लाड, एकनाथ सावंत, महेश लाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

या रस्त्यामुळे ग्रामस्थांची गरसोय दूर होणार असून, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानून गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.