श्री क्षेत्र खोटले येथे 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव

 मसुरे | झुंजार पेडणेकर श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वा.श्री पादुका दुग्ध अभिषेक, षडोपचार पूजा, सकाळी १०वा.तिर्थप्रसाद दुपारी १२ वा.आरती, दुपारी १२. ३० वा.महाप्रसाद,
संध्या. ५वा.नित्योपसना, संध्या. ६ वा.सुस्वर भजन एस.एस.पी.एम. भजन मंडळ, पडवे,
रात्री ८ नंतर भाविकांची भजने स्वामी पाठ. भाविकांनी श्री दर्शन व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन
उत्सव समिती व मठाधीपती श्री. गणेश घाडीगांवकर यांनी केले आहे.