दोडामार्ग l प्रतिनिधी :जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग आणि पंचायत समिती, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२५ ते बुधवार, दिनांक १० डिसेंबर २०२५ या दोन दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार आहे.
तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एम. आर. नाईक विद्यालय, कोनाळकट्टा येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM’ हा आहे
या कार्यक्रमाचे उद्घाटन ०९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता
उद्घाटक श्री. सुरेश दळवी अध्यक्ष, तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ, कोनाळकट्टा तथा माजी जि. प. अध्यक्ष यांचे हस्ते होणार आहे
प्रमुख अतिथी: म्हणून आमदार दिपक केसरकर (माजी शालेय शिक्षण मंत्री )
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती डॉ. श्री. गणपती कमळकर (शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प. सिंधुदुर्ग), श्रीम. कविता शिंपी (शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि. प. सिंधुदुर्ग) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन हे
दोन दिवसीय असून प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे









