अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव श्रद्धेय भक्तिभावाने संपन्न.
प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती संपन्न.
मसुरे | झुंजार पेडणेकर
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पुरोहित मंदार महाराज पुजारी, प्रथमेश इंगळे व विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व सत्संग महिला भजनी मंडळातील भजन करी व उपस्थित स्वामी भक्तांच्या मुखातून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामजपाने अवघा आसमंत दुमदूमला होता. निमित्त होते श्री दत्त जयंती उत्सवाचे.
अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुवारी श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने अक्कलकोट शहरात व श्री वटवृक्ष मंदिरात सर्वत्र उत्साहपुर्ण भक्तीमय वातावरण दिसले. पहाटे ४ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहनराव (गुरुजी) पुजारी यांच्या
अधिपत्त्याखाली, मंदिर समितीचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेल्या स्वामी भक्तांची स्वारी या काळात अक्कलकोटी विसावली. यामध्ये पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, घाटकोपर, भांडुप-मुंबई, बार्शी, भातम्बरे, इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता. या दिंडी व पालखी सोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली होती. पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत दिवसभरात हजारो स्वामीभक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व प्रसंगी टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले.
भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. तसेच मंदीरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आले होते. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्त जन्म आख्यान, वाचन, व दत्तसंप्रदायिक भजन होऊन सायंकाळी ६ वाजता पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज, मोहित महाराज यांच्या हस्ते पाळणा पूजन व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, कौशल्या जाजू, शकुंतला कटारे, सुरेखा तेली, सुवर्णा जाधव,
गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, मोहन जाधव, जयप्रकाश तोळणूरे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, प्रदीप हिंडोळे, महादेव तेली, स्वामीनाथ लोणारी, सचिन हन्नूरे, सागर दळवी, लखन सुरवसे, रमेश होमकर, सचिन पेटकर, ओंकार महाडीक, सागर गोंडाळ, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, महेश मस्कले, बंडोपंत घाटगे,
श्रीशैल गवंडी, चंद्रकांत गवंडी, दर्शन घाटगे, समर्थ स्वामी, ज्ञानेश्वर भोसले, आकाश चुंगीकर, तुषार मोरे, आदीत्य गवंडी, आकाश शिंदे आदीसह भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.














