मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त राज्य स्तरीय ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. साधना साप्ताहिकाच्या “गांधींच्या सहवासात लुई फिशर ” हा विशेषांक वाचण्यासाठी देण्यात आला होता. त्यावर आधारीत २५ प्रश्नांची ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत राज्यभरातून ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या ऑनलाईन स्पर्धा परीक्षेत ९६% गुण मिळवून गुरुनाथ ताम्हणकर बागायत सिंधुदुर्ग आणि दीपक गुंड्ये वरळी मुंबई यांना प्रथम क्रमांक मिळाला. उर्वरित निकाल खालील प्रमाणे.
द्वितीय क्रमांक – राम धुमाळ, शिवाजी पाटील, ऋतुजा केळकर, सूर्यकांत साळुंके.
तृतीय क्रमांक – सदानंद तावडे, अनघा मालवणकर, प्रकाश उनकुले, प्रिया पाटील.
उत्तेजनार्थ – साक्षी देसाई, वेदांत सावंत, सविता सावंत, सायली लांबर, सच्चिदानंद कर्ले, मनस्वी कर्ले, दिव्या पिल्ले, स्वप्नाली ठूल, पूर्वा तांबे, धाकलु डवरी, विशाल आंबेरकर, जागृती आंबेडकर, नारायण आंबेरकर, श्रुतिका डिचोलकर, स्वाती धुरी, संगीता महाजन, प्रेरणा लोहार, वैष्णवी आचरेकर, दीपक ठाकरे, ओवी आरोसकर, आचल ओरोसकर, भावेश मोरे, रोहिणी मसुरकर. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या स्पर्धेतील प्रथम १० क्रमांकांना साधना साप्ताहिकाच्या वतीने श्री. विनोद शिरसाट यांनी लुई फिशर यांनी लिहिलेले ” The Life Of Mahatma Gandhi ” हे ८००/- रु. किंमतीचे पुस्तक भेट देण्यात आले. या ऑनलाईन बक्षीस समारंभास सेवांगणचे अध्यक्ष – ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष – किशोर शिरोडकर, कार्यवाह – लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष – शैलेश खांडाळेकर. व सर्व सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेचे नियोजन दीपक भोगटे व वीणा चव्हाण यानी केले.












