श्रीदेव एकमुखी दत्त मंदिर घुडेवठार रत्नागिरी येथे दत्त जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.

रत्नागिरी:
या उत्सवात पालखी मिरवणुकी दरम्यान महिलांसाठी विषेश लावण्यवती २०२५ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मोठा गट प्रथम क्र. कु साईशा प्रशांत घुडे, द्वितीय क्र. सौ सौम्या सुधेंदू घुडे, तृतीय क्र. सौ तेजल सुमित बोरकर, उत्तेजनार्थ सौ. श्रीज्ञा रूतेज धुळप यांनी पटकावला. तर लहान गट प्रथम क्र. कु. ज्ञानवी यरम द्वितीय क्र. कु. वेदिका निखिल बोरकर तृतीय क्र. कु. पर्णी ओंकार विलणकर, उत्तेजनार्थ पारितोषिक कु. सिया निखिल बोरकर व कु. गार्गी शैलेश बोरकर यांनी पटकावला तसेच सर्व सहभागी महिलांना भेट वस्तू देवुन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेस सौ. राधिका चव्हाण मॅडम पर्यवेक्षक म्हणून लाभल्या होत्या. स्पर्धेचे नियोजन कु. जान्हवी नरेंद्र घुडे व सौ. निकिता निखिल बोरकर या महिलांनी उत्तम प्रकारे केले होते.