ग्रामपंचायत व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे आयोजन
वेंगुर्ला :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत अणसुर आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग (शाखा-वेंगुर्ला) यांच्या संयुक्त विद्यमाने अणसुर येथे उद्या, रविवार, ७ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर पूर्ण प्राथमिक शाळा, अणसुर वरचे येथे सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून मानवतेच्या कार्याला हातभार लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्ताची गरज कधीही भासू शकते आणि एका रक्तदानातून किमान तीन गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. हेच उदात्त ध्येय समोर ठेवून अणसुर ग्रामपंचायत आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला आहे. या शिबिरात स्थानिक नागरिकांनी आणि परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या भावनेतून हे कार्य यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी अधिक माहितीसाठी सत्यविजय गावडे (9405158964), संजय पिळणकर (9403298227) किंवा अलिस्टर ब्रिटो (+919673462278) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.












