स्वसंरक्षणात आजच्या मुलीनी सामर्थ्यशाली व्हावे – डाॕ.मनिषा नारकर

वैभववाडी | प्रतिनिधी : आपल्या समवेत पोलीस, सरकार आणि न्यायदान व्यवस्था असली तरी आधुनिक काळात युवतीनी मानसिक गुलामगिरी फेकून स्वतःचे स्वसंरक्षण स्वतः करावे असे प्रतिपादन डाॕ. मनिषा नारकर यानी केले. त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या.
महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग, रोटरी क्लब वैभववाडी व आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष व अभाविप आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव श्री प्रमोद रावराणे, विश्वस्त श्री शरद रावराणे, प्राचार्य डाॕ. सी.एस.काकडे, रोटरीचे अध्यक्ष श्री. संजय रावराणे, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.वैशाली काकडे, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या डाॕ.मनिषा नारकर, संरक्षण अधिकारी श्री मिलींद कांबळे, पीएसआय श्री रोहित खोत, हवालदार अडुळकर मॕडम, हवालदार तुळसकर, अभाविपचे शिवाजी भावसार, रोटरीचे तेजस आंबेकर, सुर्यकांत पाटील, नंदिनी पवार, श्रेया धावले, स्नेहल खांबल, नामदेव गवळी, महिला विकास कक्षाच्या व्ही.सी.काकडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्राचार्य श्री काकडे, श्री. खोत, मिलींद कांबळे, संजय रावराणे, प्रमोद रावराणे यानी मनोगत व्यक्त केले. आभार उपप्राचार्य प्रा.आनंद कांबळे यानी मानले.