खेड (प्रतिनिधी) – मुंबई–गोवा महामार्गावरील बोरघर परिसरात रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास मोटरसायकलचा अपघात झाला. मुंबईतील भांडुप येथून गुहागरकडे जात असलेली MH 14 FB 2350 ही मोटरसायकल अचानक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला घसरली. या अपघातात मोटरसायकलवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.घटनेनंतर तत्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले. भरणे नाका ब्रिजजवळ नेहमीप्रमाणे तैनात असलेली श्री जगद्गुरू नरेंद्राचार्यजी संस्थान नानिजधाम यांच्या २४ तास मोफत उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले.जखमींमध्ये विशाल रामचंद्र गुरव (वय ३०, रा. मालवण) आणि प्रवेश सदानंद बाईत (वय ३०, रा. गुहागर–रामपूर) यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयातून पुढील उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.













