रायगड :
• दिनांक १९/०७/२०२३ रोजी रात्री मौजे चौक – मानिवली ता. खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने आदिवासीवाडीतील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचीa प्राथमिक माहिती रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास प्राप्त झालेली आहे.
• प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तात्काळ पाचारण करण्यात आले. परंतु दुर्गम भाग व मुसळधार पाऊस यामुळे रात्री १२-४० व्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी बचाव पथकासह पोहचली असून, तात्काळ बचाव कार्यास यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे २५ स्वयंसेवक, ३० चौक ग्रामस्थ, वरोसे ग्रामस्थ २०, नगरपालिका खोपोली यांचेकडील २५ कर्मचारी, चौक ग्रा. पं. कडील १५ कर्मचारी, निसर्ग ग्रुप पनवेल यांचेकडील १५ स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफटर्स इत्यादींच सहभाग आहे. इरशाल गडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, अॅम्बुलन्ससह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
• खालापूर तालुक्यातील मौजे चौक- मानिवली महसूली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी स्थित असून, सदरील वाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाल गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. स्थानिक माहितीवरून सदरील आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे.
• इरसालवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. खालापूर तालुक्यामध्ये दि. १७/०७/२०२३ ते दि.१९/०७/२०२३ या ३ दिवसामध्ये एकूण ४९९ मिमि पावसाची नोंद झालेली आहे. सदर ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात स्थित असून, सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे जागते. सद्यस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी तसेच अद्यापही काही प्रमाणात भूस्खलन होत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. तथापिक NDRF पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बचावकार्य युध्द पातळीवर सुरु आहे.










