भाजप आणि सहकारी पक्षांचे चारशे खासदार २०२४ मध्ये निवडून येतील;केद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा विश्वास

राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक ३८ जागा भाजप महायुती जिंकेल

 भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेचा गृहराज्यमंत्र्यांनी घेतला गाठीभेटी तून आढावा

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजप महायुती विक्रमी मताधिक्याने विजयी होईल

गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारचे काम जनतेच्या तोंडी, विकास कामातून केले परिवर्तन

गृहराज्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत विकास कामांचा सादर केला लेखाजोखा

संतोष राऊळ ( ओरोस ) २०२४ मध्ये भाजपा ३५० स्वतःच्या आणि इंडिये तील सहकारी पक्षांसमवेत ४०० जागावर निवडून येईल. असा विश्वास केद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सहज विजयी केली जाईल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या ३८ सर्वाधिक जागा महायुती जिंकेल असेही त्यांनी सांगितले.
केद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी ओरोस येथे पत्रकार परिषद घेवून संवाद साधला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,प्रदेश सचिव प्रमेद जठार,महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, दादा साईल,आदी उपस्थित होते.

समाजात सतत विधायक काम करणारी आमची पार्टी आहे. सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोचून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. गेली ९ वर्षे सकारात्मक काम केले आहे. त्यामुळे समाज परिवर्तन होत आहे.
चांगले परिणाम या लोकसभा मतदार संघात दिसत आहेत.
विकासाच्या अपेक्षा नेहमीच असतात मात्र त्यांचे बदलते रूप जनतेत आणायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलजिवन मिशन यशस्वी केले.,१९ कोरोड ग्रामीण भागातील परिवार आणि इतर असे १२ करोड ४० लाख लोकांना नळाचे पाणी जल जीवन मिशन अंतर्गत दिले. ही योजना आजही युद्धपात्र देशात सुरू आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये जे काम झाले नाही ते काम मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात करून दाखवले आहे आणि याचे परिणाम खूपच चांगले आहेत आपण पाहू शकता १२ करोड ६० लाख शौचालय बनवले त्यामुळे रोगराई नष्ट झाली आणि देशभर स्वच्छता दिसू लागली.९ करोड ६० लाख लोकांना गॅस दिला.१ लाख ५५ हजार किलो मिटर महामार्ग बनविला. त्याचप्रमाणे पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत गावोगावी जाणारे रस्ते बनवले.

सिंधुदुर्गाचा विचार करता पाच हजार पेक्षा जास्त पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे बांधून दिलेली आहेत. याठिकाणी ५०० बेडचे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उभे करून जनतेला सेवा द्यायची आहे. टीबी रोगावर नियंत्रण आणून सुदृढ आरोग्याचा संदेश मोदी सरकारने देशभर दिलेला आहे.
देशात ११ मोठे हायवे बनविले आहेत.त्यात मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा समावेश आहे.
मोदी सरकारने सुरुवातीच्या काळात जनधन योजनेअंतर्गत ३८ करोड बँक खाते खोलली. त्यात २५ लाख करोड रुपये भरले आहेत. काहीवेळ सकारात्मक निर्णय घेवून काम पुढे चालले आहे. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी काही बोगस लाभार्थी ऑनलाईन लाभ घेत होते मात्र त्यावेळी चौकशी करण्यासाठी योजना थांबवणे शक्य नव्हते आता या योजनेतील लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन त्यांची सत्यता टप्प्याटप्प्यावर पडताळली जात आहे आणि त्यामुळे बोगस लाभार्थी या योजनेतून आपसूकच वगळले जाणार आहेत.माझ्या खात्या अंतर्गत जनगणना भवन तयार केले आहे. त्यामुळे यापुढे पारदर्शक कारभारासाठी हे महत्वाचे ठरणार आहे.भ्रष्टाचारी लोकांची चौकशी होणार. चौकशी आणि न्यायपालिका काम करत राहणार आहे.त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे काम अतिशय उत्तम आणि योग्य रीतीने चाललेले आहे ते पाहून मी समाधानी आहे. वेंगुर्ला येथील ५७ नंबर बूथ ची मी प्रत्यक्ष पाहणी केली. ५० मतदारांमध्ये एक कार्यकर्ता अशा पद्धतीचे जनतेत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले नियोजन समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमा हैदर यांच्या बाबतीत मीडिया स्वतः देशाला काय हवे आहे आणि काय नको ते दाखवत आहे. सरकारचे या घटनेमध्ये लक्ष आहे.त्यांची चौकशी सुरू आहे.असेही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितले.