दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील साठरेबांबर तळी येथून चार गावठी बैलांची बेकायदेशिरपणे वाहतुक करणाऱ्या कोल्हापूर येथील दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 18 डिसेंबर रोजी दुपारी 2.15 वा.सुमारास करण्यात आली. संशयितांकडून एक आयशर टेम्पो आणि चार बैल असा एकूण 8 लाख 49 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ॠषीकेश दिलीप खोंगे (रा.ससेगाव ता.शाहूवाडी,कोल्हापूर) आणि अविनाश सुरेश गोसावी (23,रा.शाहुवाडी,कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महिला पोलिस शिपाई दर्शना शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,दोन्ही संशयित संगनमताने आपल्याकडे गुरे वाहतुक करण्याचा कोणताही परवाना नसताना गुरुवारी दुपारी आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (एमएच-09-जीजे-5585) मधून चार बैलांची वाहतुक करत होते. या बैलांची पशूवैद्यकिय अधिकाऱ्यांकउून वैद्यकिय तपासणी न करता तसेच त्यांना पाणी अगर खाद्य न देता टेम्पोमध्ये वेदना किंवा यातना होतील अशा पध्दतीने दोरीने वाहतुक करण्यात येत होती. संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.








