देवगड | जलवाहीनी दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू

 

अखेर पालकमंत्र्यांनी शिष्टाई करून ठेकेदाराला दुरूस्ती करण्याबाबत दिल्या सुचना

शुक्रवारी सकाळपासून दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू

मात्र पाणीपुरवठा होणार शनिवारपासून सुरू

देवगड : प्रतिनिधी

देवगड जामसंडेमधील नागरिकांचा गेले सहा दिवस पाणीपुरवठा बंद होता अखेर पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशामुळे ठेकेदारांनी दुरूस्ती करण्यास शुक्रवारी सुरूवात केली.जलवाहीनी दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून पाणीपुरवठा शनिवारपासून सुरू होणार आहे.

सध्या वारंवार फुटणारी जलवाहीनी दुरूस्त करूनही पुन्हा फुटत असल्यामुळे देवगड जामसंडेमधील नागरिकांचे पाण्याचे हाल सुरू आहेत.बुधवारी दुपारी पाईपलाईन फुटली.यामुळे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला .दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी यामध्ये शिष्टाई करून ठेकेदाराला सुचना दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळपासुन दुरूस्तीचे काम सुरू केले असून शनिवारपासून पाणीपुरवठा सुरू होणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी निधी दिल्याने हे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच देवगडचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे.