गुहागर शहर नाक्यातील दुकानांचे बांधकाम हटविले

भाजपा जिल्हाअध्यक्ष सतिश मोरे यांचे विषेश प्रयत्न 

गुहागर (प्रतिनिधी)
गुहागर शहरातील नाक्यामध्ये गेले अनेक वर्ष वाहतूकिची समस्या भेडसावत होती. नाक्यामध्ये सर्वाधिक मोठया प्रमाणामध्ये जड वाहनांची नाकामध्ये वाहतुक कोंडी होत होती. दुकानदारांनी दुकाने मोकली केली मात्र दुकानांच्या भिंती आणि मातीचा मलबा रस्त्यावरच पडून होता. अखेर भाजपा जिल्हाअध्यक्ष सतिश मोरे यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना धारेवर धरुन जेसीबीच्या सहाय्याने रस्ता गुहागर वाशीयांसाठी मोकळा करुन दिला.

गुहागर विजापूर महार्मागाला सुरुवात होते ते ठिकाण म्हणजे गुहागर शहरातील नाका होय. गेले अनेक दिवस शहरामध्ये असलेले दुकानदार आणि रस्त्यावरील रहिवाशी या प्रशासन यांच्यामध्ये या कामांबाबत आणि मोबदल्याबाबत न्यायालयात वाद सुरु होते. मात्र हे वाद संपल्यावर प्रांत अधिकारी यांनी सबंधित मालकांना त्यांच्या मोबदला नियमानुसार दिला आणि जागा खाली करण्याच्या नोटिशी दिल्या. त्या नंतर संबंधित मालकांनी सर्व दुकाने खाली केली आणि स्वखर्चाने दुकानातील लाकडी सामान काढून घेतला मात्र भिंतीचे सामान तसेच उभे राहीले. आणि मातीचा मलबा रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी होत होती. याबाबत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सतिश मोरे आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित अधिकारी यांना जाब विचारला जेसिबीच्या सहाय्याने भिंती पाडून मलबा हटविला आणि गुहागर नाक्याने मोकला श्वास घेतला. यामुळे आता वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे. गुहागर वाशीयांनी या बाबत जिल्हा अध्यक्ष सतिश मोरे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

फोटोः गुहागर शहर नाक्यातील दुकानांचा मातीला मलबा घटवितांना पाहणी करतांना जिल्हाअध्यक्ष सतिश मोरे आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर, सरचिटणिस संतोष सांगळे आणि पदाधिकारी.