आई आधार केंद्राच्या वकृत्व स्पर्धेत सती विद्यालयाच्या कु. इच्छा कदमचे यश

चिपळूण (प्रतिनिधी) : आई आधार केंद्र आयोजित कै, पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती जिल्हा स्तरीय शालेय वकृत्व स्पर्धेत न्यु इंग्लिश स्कूल खेर्डी, चिंचघरी, सती व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु.इच्छा सिताराम कदम हिने तृतीय क्रमांक पटकाविला. नुकतीच राजापूर तालुक्यातील ओणी येथील नुतन विद्यामंदिर येथे हि स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता,याच स्पर्धेत मुळची अनारी गावची व सध्या न्यु इंग्लिश स्कूल खेर्डी, चिंचघरी, सती व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण घेणारी कु. इच्छा हिने सहभाग घेतला होता.स्पर्धेसाठी तीने “ ग्रंथ माझे सांगाती “ हा विषय निवडून तृतीय क्रमांक पटकाविला. याअगोदर कु. इच्छा कदम हिने इस्त्रो,नासा यासारख्या उपक्रमांमध्ये यशस्वी कामगिरी केली असून ती या विद्यालयाची अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून परिचित आहे.तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय वरेकर,मार्गदर्शक शिक्षिका सौ.जी.जी.मेस्त्री,सौ.एस.एस.मोरे,श्रीम.पी.पी.शिंदे,अनारी गावचे सरपंच श्री.सदानंद पवार,अनारी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री.सिताराम कदम,माजी उपसरपंच श्री.विजय कदम,केदारनाथ ग्रामसुधार समिती (अनारी) चे अध्यक्ष श्री.कृष्णा पवार ,त्याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे