जलमय स्थिती ; वायरी जाधववाडी येथे घरात पाणी घुसले ; देवबाग येथे घरावर माड कोसळून नुकसान

 

मालवण | प्रतिनिधी ; मालवणात मुसळधार पावसामुळे जलमय स्थिती निर्माण झाली आहे. देवबाग मोबारवाडी येथील संजय कुमठेकर यांच्या राहत्या घरावर माड कोसळून नुकसान झाले. तर वायरी जाधववाडी येथे सुनील मोरजकर, संतोष तारी यांच्या घरात पाणी शिरले. याठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे आपत्कालीन यंत्रणा नसल्याचे सांगत भाई मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.