मसुरे | झुंजार पेडणेकर : सौ.इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल, पोईप या प्रशालेतील इयत्ता ५ वी मधील विद्यार्थी, कु. सोहम सदाशिव पालव याने महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे आयोजित अखिल भारतीय हिंदी ऑलिम्पियाड “बोधिनी” परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या यशा बद्दल कौतुक होतं आहे.












