दापोली (प्रतिनिधी) : तामिळनाडू येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या ” नेशनल कलाथाई सिलेबन (मैदानी खेळ) या स्पर्धेत दापोलीस्थित प्रकाश देवरुखकर यांचा नातू कु.अर्णव हर्षल देवरूखकर याने सुरूल आणि स्टीक फाईट या खेळांच्या प्रकारात उज्वल यश संपादन करून आपल्या क्रीडा कौशल्याची विशेष चुणूक झखवून दाखविली आहे.
कु. अर्णव याने एक सुवर्णपदक व एक रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्यांच्या या यशात आई-बाबा श्री हर्षल व सौ. क्षमा, आजी शितल देवरुखकर याबरोबरच वेस्टर्न पॅलेस्टा ॲकॅडमी पुणे या संस्थेचे संचालक अक्षय भुजबळ, प्रशिक्षक अविराज धामणसकर यांचा मोलाचा वारा आहे. कु. अर्णव याचे जानेवारी २०२६ मध्ये गोवा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अर्णवच्या या यशाबद्दल त्याचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.












