देवगड : देवगड येथील कंटेनर थिएटरमध्ये ‘आशा’ हा आशा स्वयंसेविकांच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या बालपणीची भूमिका साकारणारी बालकलाकार रुची नेरूरकर हिने आज देवगडमधील सिनेप्रेक्षक व चहाते यांच्याशी भेट घेऊन संवाद साधला.
यावेळी उपस्थित आशा स्वयंसेविका तृप्ती कांबळे, सोमण मॅडम आदी आशा स्वयंसेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कंटेनर थिएटरचे व्यवस्थापक यश रानडे उपस्थित होते.
चित्रपटातील कलाकार व मान्यवरांनी यावेळी संवाद साधत आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे कौतुक केले. ‘आशा’ हा चित्रपट आशा स्वयंसेविकांचा सन्मान असून त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, मेहनत व सामाजिक योगदान मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थितांमध्ये रुची नेरूरकर, निधी पारकर, गौरव तेली, यश रानडे, मंगल देसाई, सुमेधा देसाई आदी मान्यवरांचा समावेश होता.
हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन बालकलाकार रुची नेरूरकर हिने सिनेप्रेक्षक व चहाते यांना केले.












