जिल्हा बँक मसूरे शाखेचे विशेष योगदान
मसुरे | झुंजार पेडणेकर : प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत कै. मंगेश शरद बागवे यांच्या पत्नीस दोन लाख रुपये रकमेचा धनादेश सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक मसुरे शाखेत देण्यात आला. विस रुपया मध्ये सदर विमा जिल्हा बँक कडून करण्यात आला होता. मंगेश बागवे यांच्या निधना नंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे विकास अधिकारी स्वप्नील केळूसकर, मसुरे शाखाधिकारी संतोष गावकर यांनी पाठपुरावा करून सदर विमा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी श्रीमती अर्चना बागवे, अनुश्री बागवे, लिपिक रवींद्र मोहिते, मनिष बागवे, सुनिल मसूरकर, पुंडलिक माळगावकर, अनिल कासले आदी उपस्थित होते.












