शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर
मालवण | प्रतिनिधी : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. आमदार निलेश राणे यांचा स्टार प्रचाराकांमध्ये समावेश झाला आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार निलेश राणे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने मुंबईसह संपूर्ण राज्यात निलेश राणेंची तोफ धडाडणार आहे.
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत निलेश राणे यांचा आक्रमक व प्रभावी प्रचार राज्यात चर्चेचा ठरला. मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवल्यानंतर शिवसेनेने आमदार निलेश राणे यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेन स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. त्यात आमदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.













