खिशातील आधारकार्ड व पँनकार्डमुळे मृतदेहाची ओळख पटली
साखरपा :
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडीतील स्मशानभूमीत लांजा तालुक्यातील केळवली येथील प्रकाश गणू कोटकर (वय ५५) यांचा मृतदेह सापडल्याने साखरपा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील शैलजा पवार व साखरपा सरपंच शशिकांत लिंगायत यांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा करून पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, स्वप्नील कबळे, गणेश सुतार यांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून पोलीस कारवाई सुरु आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या खिशात आधारकार्ड व पँनकार्ड मिळून आल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलीसांना यश आले आहे.












