बँकेकडून जप्त करण्यात मिळकतीमध्ये बेकायदेशिररित्या प्रवेश; आदेशाचे उल्लंघन

मजगाव येथील एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बँकेकडून जप्त करण्यात आलेल्या मिळकतीमध्ये बेकायदेशिररित्या प्रवेश केला. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेश व कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडील आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 24 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली.
दानिश जमिर पटेल (39,रा.राजनगर चर्मालय मजगाव रोड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात अख्तर फकिर महंमद काझी (59,रा.पावस,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयिताची मौजे नाचणे येथे दोन मिळकती आहेत. या दोन्ही मिळकती बँकेकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. संशयिताने बँकेच्या ताब्यात असलेल्या या मिळकतीमध्ये बेकायदेशिरपणे प्रवेश करुन मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून नुकसान केले. तसेच सिक्यूरिटी प्रकाश बावधने यांनी संशयिताला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाच मारण्याची धमकी देउन घरात प्रवेश केला. त्यावर फिर्यादी अख्तर काझी यांनी त्याच्या या कृतीस विरोध केला. परंतू संशयिताने त्यांना जुमानलेले नाही. तसेच त्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेश व कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडील आदेशाचे उल्लंघन करुन मिळकतीत प्रवेश करुन बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता ठकवणूक केली आहे