चिपळूण (प्रतिनिधी) : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व शिवसेना शिंदे गट पक्षाचे युतीचे उमेदवार नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी महाड चवदार तळे येथे शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन आयोजित कार्यक्रमात अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमानंतर बौद्धजन पंचायत समिती जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव व बौद्धजन पंचायत समिती चिपळूण तालुका कार्यकारिणी यांनी नवनिर्वाचित चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष उमेश सकपाळ त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन विजय झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव यांनी उमेश सकपाळ हे नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने या खुर्चीला न्याय मिळाला असे व्यक्त केले. यावेळी चिपळूण तालुका बौद्धजन पंचायत समिती अध्यक्ष शांताराम जाधव, सरचिटणीस राकेश मोहिते, सहचिटणीस जीवन पवार, खजिनदार आयु. रवींद्र सावंत साहेब, सदस्य विनोद हिरे, नितीन जाधव, ॲड. सुयश जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, शहराध्यक्ष मंगेश सकपाळ, उमेश सकपाळ, अमोल जाधव, पत्रकार मिलिंद सकपाळ, राजेश जाधव, रुपेश मोहिते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













