वजराट येथील श्री गिरेश्वर सोसायटी चेअरमनपदी मनोहर परब यांची बिनविरोध निवड 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

तालुक्यातील वजराट येथील श्री देव गिरेश्वर सहकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी मनोहर महादेव परब व व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय उर्फ अण्णा भास्कर वजराटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यासी अधिकारी प्रशांत साळगावकर यांच्या उपस्थितीत संस्था कार्यालयात ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी माजी चेअरमन बाबुराव परब, सरपंचा अनन्या पुराणिक यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी चेअरमन वसंत पेडणेकर, संचालक रमाकांत सोनसुरकर, नितीन परब, जगदीश भोसले, वसंत परब, अपर्णा करंगुटकर, हरिश्चंद्र वजराटकर, अनंत परब, दिगंबर पेडणेकर, आनंद पुराणिक, प्रेमानंद भोसले, सचिव पांडुरंग दळवी, सेल्समन रवींद्र पेडणेकर, नितीन सावंत आदी सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.