तुळस येथील वक्तृत्व, आरती गायन व स्तोत्र पाठांतर स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

वेंगुर्ले : प्रतिनिधी : वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तुळस यांच्या वतीने आयोजित अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे भव्य आयोजन श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथील कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात करण्यात आले होते. या महोत्सवात वक्तृत्व (लहान व मोठा गट), आरती गायन, संस्कृत श्री गणपती स्तोत्र पाठांतर तसेच श्री मारुती स्तोत्र पाठांतर या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

श्रीमंत पार्वती वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव डॉ. सचिन परुळकर, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक कोल्हे सर, सामाजिक कार्यकर्ते संदीप पेडणेकर, संदीप तुळसकर, बबन घोडे पाटील यांच्यासह सर्व परीक्षक व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
वक्तृत्व स्पर्धा – निकाल
गट : ८ वी ते १० वी (खुला शालेय गट)
प्रथम क्रमांक – मृदुला नाना सावंत (दिव्य ज्योती स्कूल,डेगवे), द्वितीय क्रमांक – यज्ञेश युवराज शिंदे (नेमळे हायस्कूल), तृतीय क्रमांक – अस्मी प्रवीण मांजरेकर (आर. पी. डी., सावंतवाडी)
उत्तेजनार्थ प्रथम – श्राव्या अनुप कांबळी (पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला), उत्तेजनार्थ द्वितीय – अमृता दत्ताराम नवार (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा)
वक्तृत्व स्पर्धा – निकाल
लहान गट (५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक – स्पृहा सुमित दळवी, द्वितीय क्रमांक – श्रेयस हेमंत रेडकर (मदर क्विन, सावंतवाडी), तृतीय क्रमांक – प्रांजल रूपेश नार्वेकर (जि. प.उभादांडा न ३), उत्तेजनार्थ प्रथम – चिन्मयी बुधाजी बागवे (मदर क्विन, सावंतवाडी), उत्तेजनार्थ द्वितीय – ज्ञानेश्वरी प्रवीण तांडेल (श्री शिवाजी हायस्कूल,तुळस)
संस्कृत श्री गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धा – निकाल
प्रथम क्रमांक – शुभ्रा मनोजकुमार ठुंबरे (जि.प. शाळा शारदा, तुळस), द्वितीय क्रमांक – विहान कुणाल तेंडोलकर (मराठा समाज भगिनी मंडळ, कुडाळ), तृतीय क्रमांक – माही प्रणव सावंत (स्मॉल वंडर, कुडाळ), उत्तेजनार्थ प्रथम – सौरभ प्रथमेश तुळसकर (जि.प. शाळा वेताळ, तुळस), उत्तेजनार्थ द्वितीय – श्रिया सुनील परब (जि.प.शाळागोवर्धन, तुळस)
श्री मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा – निकाल
प्रथम क्रमांक – पायल दत्ताराम गोवेकर (जि. प. दाभोली नं. १),
द्वितीय क्रमांक – अर्णव समीर धुरी (जि. प. वेंगुर्ला नं. १),
तृतीय क्रमांक – दक्ष तुषार वालावलकर (सुधाताई कामत शाळा नं. २, सावंतवाडी), उत्तेजनार्थ प्रथम – चिन्मयी साईप्रसाद नाईक (मदर क्विन्स, सावंतवाडी) उत्तेजनार्थ द्वितीय – वरद किरण ताम्हणकर
(बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ)
आरती गायन स्पर्धा – निकाल
प्रथम क्रमांक – श्री वेताळ विद्या मंदिर, तुळस, द्वितीय क्रमांक – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आसोली–जोसोली, तृतीय क्रमांक – जय हिंद विद्यालय, फासतळी,तुळस, उत्तेजनार्थ – मदरक्वीन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी यांनी मिळविले.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा. राम महादेव चव्हाण, प्रा. प्रगती विवेक चव्हाण, प्रा. वैभव बाबल खानोलकर व प्रा. वामन गावडे यांनी केले. संस्कृत श्री गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे परीक्षण बाबुराव देऊ खवणेकर व किरण दिनकर ताम्हणकर यांनी केले.श्री मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे परीक्षण प्रसाद बापू आडेलकर व संतोष दामोदर गोरे यांनी केले.
आरती गायन स्पर्धेचे परीक्षण शांताराम हरी आसोलकर व डॉ. जी. पी. धुरी यांनी केले. स्पर्धांच्या समारोपप्रसंगी वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व शाळांचे अभिनंदन करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार मानले.
सर्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंगेश सावंत, सदगुरू सावंत, माधव तुळसकर, सुधीर चुडजी, प्रज्वल परुळकर, वैष्णवी परुळकर,रोहित गडेकर, सागर सावंत, भक्ती भणगे, शैलजा परुळकर तसेच भूमी परुळकर यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन डॉ सचिन परुळकर यांनी केले. ‘अश्वमेध तुळस महोत्सव’ हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सांस्कृतिक व नैतिक विकासासाठी प्रेरणादायी व्यासपीठ ठरत असल्याचे यावेळी मान्यवरांकडून नमूद करण्यात आले.