गुहागर नगरपंचायत नवनिर्वाचित भाजपा नगराध्यक्षा व नगरसेवकांनी घेतली प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट

 जनसेवक म्हणून काम करा- आ. रवींद्र चव्हाण यांचा सल्ला
चिपळूण (प्रतिनिधी) : गुहागर नगरपंचायतमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांनी भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच सहकारी अनिकेत पटवर्धन यांची रायगड बंगला, मुंबई येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली व आभार व्यक्त केले. तर प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुहागर शहराच्या विकासासाठी जे -जे सहकार्य लागेल ते आपण करू. तुम्ही जनसेवक म्हणून काम करा, असा सल्ला देखील गुहागर नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांना दिला.
गुहागर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप -शिवसेना युतीने नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. विशेष म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, निलेश सुर्वे यातील शिलेदारांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत विशेष मेहनत घेतली. गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी नगराध्यक्षा सौ. निता मालप, नगरसेवक उमेश भोसले, नगरसेविका सौ. वैशाली मावळणकर, अनुषा भावे, सुषमा रहाटे, मिरा घाडे, विशाखा सोमण तसेच भाजपाकडून शिवसेनेला दिलेले उमेदवार सौ. स्वरा तेलगडे, संदेश उदेक, रत्नागिरी जिल्हा निवडणूक संयोजक दिपक पटवर्धन, रेल्वे समिती सदस्य सचिन वहाळकर , जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, पदवीधर पदाधिकारी अशोकजी दळवी, शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल भोबस्कर, गुहागर तालुकाध्यक्ष अभयजी भाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सांगले, शहराध्यक्ष नरेश पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष मुन्ना पालशेतकर उपस्थित होते