वेंगुर्ले येथे २ जानेवारी पासून स्व. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा…

मुंबई, कोल्हापूर, गोव्यासह नामवंत २० संघांचा समावेश

वेंगुर्ले l दाजी नाईक :बी. के. सी. असोसिएशन, मुंबई पुरस्कृत स्व. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ले येथे नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात शुक्रवार २ ते रविवार ४ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये मुंबई, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नामवंत २० एकांकिका सादर होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन पहिल्या दिवशी सायं. ५.०० वा. मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धेमध्ये शुक्रवार २ जानेवारी २०२६ रोजी पहिल्या दिवशी सायंकाळी उद्घाटनानंतर कारवा थिएटर्स, कोल्हापूर यांची “म्हव उठलाय” , राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर यांची “Halfway” गंधर्व थिएटर्स, मिरारोड यांची “कडी” आणि अखिल महाराष्ट्र नाट्य शिक्षण परिषद समिती व आर्यरूप नाट्यसंस्था, सांगली यांची “इन सर्च ऑफ” या चार एकांकिका सादर होणार.

दुसऱ्या दिवशी शनिवार दि. ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजल्यापासून स्पर्धा सुरू होईल. या दिवशी सात एकांकिका सादर होतील यामध्ये आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल, नेरूर यांची “देवराई”, बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांची “वन सेकंड्स लाईफ”, थिएटरवाले, मुंबई यांची “हिरो नंबर वन”, अक्षरसिंधू कलामंच, कणकवली यांची “भरकाट”, पृथा थिएटर्स, वेंगुर्ला यांची “अमृतस्य पुत्र”, गवाक्ष व्हिजन, ठाणे यांची “मर्सिया” आणि अवयुक्त, मुंबई यांची “पडदा” यांचा समावेश आहे.

तर तिसऱ्या दिवशी रविवार ४ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजल्यापासून स्पर्धा सुरू होईल. या दिवशी एकूण ९ एकांकिका सादर होतील. यामध्ये पहिल्या सत्रात रंगवलय, अंधेरी यांची “बार बार”, देशभक्त रत्नाप्पा कुमार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर यांची “ग्वाही”, इंद्रधनु कलामंच, बोरीवली यांची “द फॅन्टसी” या एकांकिका सादर होतील तर दुपारी ३.०० वाजल्यापासून क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई यांची “तळ्यात मळ्यात”, नाटकवेडे, रत्नागिरी यांची “श्यामची आई” , ज्ञान प्रसारक मंडळ महाविद्यालय व संशोधन केंद्र मापसा गोवा, यांची “सुंनरी सखी”, कलासक्त, मुंबई यांची “पेंडुलम”, प्रो इव्हेंट्स मुंबई यांची “माकड, मांजरचोर आणि पिकाचू” आणि शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर यांची “होळी झाली” या एकांकिका सादर होतील. स्पर्धा संपल्यानंतर रात्री उशिरा स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे.