एकनाथ आव्हाड यांची नगर वाचनालयास भेट…!

कणकवली -साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांनी कणकवली नगरवाचनालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, सदस्य महेश काणेकर, वैजयंती कंरदीकर, साहित्यिक रामा मेस्त्री, बाबुराव मेस्त्री, प्रकाश केसरकर आदी उपस्थित होते. आव्हाड यांनी वाचनालयाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केली. यावेळी वाचनालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.