सचिवपदी रोहन शिंदे
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ या संघटनेच्या विजयदुर्ग आगाराच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चालक पी. वाय. मिठबावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव पदी रोहन शिंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष अंकुश काळे, कार्याध्यक्ष शंकर वळवी सहसचिव संतोष देवरुखकर, खजिनदार प्रवीण भोसले, सहखजिनदार राकेश सारंग, सल्लागार महेश पाटील, प्रसिद्धी सचिव परशुराम आयवाळे, संघटक सचिव इम्रान मुकादम याचबरोबर विभागीय सदस्य म्हणून शैलेंद्र परब, मंगेश कोकरे आणि प्रकाश लोम्ब्बर यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीची निवड काल सर्वानुमते करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने तसेच जिल्हा संघटनेने अभिनंदन केले आहे.










