जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने केल्या जिल्हा परिषद गटाप्रमाणे आढावा बैठका सुरू

चिपळूण (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपाचे नेते प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठकांना सुरूवात केली आहे.
यावेळी डॉ. नातू, यादव, मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये जि. प. उमरोली, कळवंडे, तसेच वहाळ, सावर्डे, कोकरे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, चिटणीस अजित थरवळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष भडवळकर, पंचायत राज जिल्हा संयोजक योगेश शिर्के, मंडल अध्यक्ष उदय घाग उपस्थित होते. प्रत्येक जिल्हा परिषद गटातील बूथ, बूथ समिती, मतदार यादीचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी युती, महायुतीचा निर्णय लवकरात लवकर करून उमेदवार जाहीर करावे. तसेच आप -आपल्या भागातील विषय मांडले . आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.