आ. दीपक केसरकरांकडून शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

सावंतवाडी शहराच्या विकासासाठी काम करा : सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज आपल्या कार्यालयात शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करीत त्यांचे अभिनंदन केले. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करा आमदार या नात्याने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी नगरसेवकांना दिली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक संजू परब, शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, सायली दुभाषी यांच्यासह माजी नगरसेवक संजय पेडणेकर, वैभव म्हापसेकर, दत्ता सावंत, दीपाली सावंत, संजना पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.