मंडणगड | प्रतिनिधी : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, भूगोल विभाग, जीवशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून याच महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. भरतकुमार सोलापुरे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. षरिफ काझी, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. संगिता घाडगे, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. हनुमंत सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन त्यामागील उद्देश सांगितला. मार्गदर्शक डॉ. भरतकुमार सोलापूरे यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध मुद्दयांची माडंणी केली. वेगाने वाढणा-या व अधिक असणारी लोकसंख्या मागास देशांच्या मागासपणाला कारणीभूत आहे की प्रगत देशांची अतिउपभोगवादी जीवनशैली जबाबदार आहे याविषयी उहापोह केला. या दिनानिमित्त वाढणारी लोकसंख्या आणि त्याविषयीचे अनेक प्रश्नांची जाणीव महाविद्यालयीन युवक-युवतीमध्ये निर्माण होण्याची आवशकता असल्याचे प्रतिपादन केले. विशेषतः स्त्री-पुरष भेदभाव मिटवणे, स्त्रीयांना शिक्षण व आरोग्याव्दारे अधिक सक्षम करणे हे गुणवत्तापूर्ण लोकसंख्येसाठी कसे महत्वाचे आहे हेही स्पष्ट केले. या कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी केले तर शेवटी प्रा. शरिफ काझी यांनी आभार मानले.
फोटो ओळी: कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. भरतकुमार सोलापूरे व सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव, व इतर मान्यवर











