दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी युवराज मंदार पेणकर ह्याची निवड

राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य ३५वी क्युरोगी आणि ११ वी पुमसे सब ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा सन २०२५-२६ कुडाळ येथे नुकत रोजी पार पडली या स्पर्धेसाठी सुमारे ४०० खेळाडूंनी सहभागी झाले होते. या स्पर्धेत तायक्वांदो ॲकॅडमी राजापूरचे ६ खेळाडूंनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्त्व करत राज्यस्तरीय स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. यामध्ये कु. युवराज मंदार पेणकर यांने २५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच कु. द्रोण संदीप चव्हाण यांने ३२ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले, कु.यज्ञेश जगदीश पेणकर यांने २३ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले, कु.श्वेत मुकेश नाचरे यांने २१ किलो वजनी गटात तर, कु. वेदांत नरेश रहाटे यांने २७ किलो वजनी गटात आपला सहभाग नोंदवला, कु. मिताली मोहन घुमे हिने ४७ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. तसेच रत्नागिरी जिल्ह्या ने क्युरोगी प्रकारात तृतीय क्रमांकाचा तर पूमसे प्रकारात प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. कु. श्रृतिका मांडवकर व कु. अंश गुंड्ये यांनी राज्य स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी बजावली.
या खेळाडूंना राजापूर तालुका प्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे त्याच बरोबर सौ. मधुरा नाचरे, कु, श्रृतिका मांडवकर, कु. अंश गुंड्ये ,कु. गौरव धालवलकर हे मार्गदर्शन करत आहेत.
खेळाडूंच्या या यशाबद्दल तायक्वांदो अकॅडमी राजापूर चे अध्यक्ष , अभिजित तेली उपाध्यक्ष, मुकेश मयेकर, संजय मांडवकर, दिपक धालवलकर, संदीप राऊत, प्रसाद शिवलकर, सौ. मानसी दिवटे, सौ दीपिका पवार, अद्वैत अभ्यंकर, निलेश रहाटे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.